पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरात एका मिनी बसला भीषण आगल्याची भयंकर घटना घडली आहे. या घटनेत ४ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक बसला आग लागल्याने चौघांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
व्योमा ग्राफिक्स कंपनीचे १२ कर्मचारी मिनी बसमधून प्रवास करत होते. हिंजवडी फेज वनमध्ये आल्यावर बसच्या चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढील काही कर्मचारी खाली उतरले. पण, मागील दरवाजा न उघडल्याने चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चालकासह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृत सुभाष भोसले (वय ४२), शंकर शिंदे (वय ६०), गुरुदास लोकरे (वय ४०), राजू चव्हाण (वय ४०) सर्व राहणार पुणे येथील आहेत.