19.3 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeमहाराष्ट्रमिळालेल्या संधीचे सोने करा : शैलेन्द्र गोस्वामी

मिळालेल्या संधीचे सोने करा : शैलेन्द्र गोस्वामी

पुणे : प्रतिनिधी
भारत सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना तसेच संशोधनाला बळ मिळत आहे. त्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोवेशन सेल व एआयसीटीईद्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (एसआयएच) स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांना कल्पकता जगासमोर आणण्याची अनोखी संधी मिळत आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी तिचा पुरेपूर फायदा घेऊन मिळालेल्या संधीचे सोने करावे, असे मत पुष्कराज ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेन्द्र गोस्वामी यांनी मांडले.

ते एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या राज कपूर सभागृहात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेल व एआयसीटीईद्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

यावेळी, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोव्हेशन सेलचे नवोपक्रम अधिकारी अभिषेक रंजन, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, नोडल अधिकारी डॉ. रेखा सुगंधी, डॉ. निशांत टिकेकर, प्रा. सुरेश कापरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच, भारत सरकारकडून दूरदृष्टी प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या उद्घाटनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, एआयसीटीई चेअरमन टी.जी. सीतारामन, डॉ. अभय जेरे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्पर्धेच्या आयोजनात कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ.सुनीता कराड यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पाँडेचेरी, कर्नाटक, केरळ, चंदिगढ, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील २९ संघांचे विद्यार्थी सहभागी झाले असून पुढील चार दिवस स्पर्धेतून विद्यार्थी आपल्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दुबे यांनी तर आभार डॉ. टिकेकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.स्नेहा वाघटकर यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR