19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमी पुन्हा येईन’ म्हणणारे, ‘मला जाऊ दे ना घरी, वाजले की बारा’ची रेकॉर्ड लावतायेत

मी पुन्हा येईन’ म्हणणारे, ‘मला जाऊ दे ना घरी, वाजले की बारा’ची रेकॉर्ड लावतायेत

मुंबई : प्रतिनिधी
‘‘मी पुन्हा येईन… पुन्हा येईन.. लोकांची घरे आणि पक्ष फोडून येईन असे गळा फोडून सांगणारे आता मला जाऊ दे ना घरी, वाजले की बारा, अशी रेकॉर्ड लावत आहेत. छान. महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहंकार आणि माज यांचे बारा मराठी माणसाने वाजवले आहेत. जय महाराष्ट्र!’’ असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा बसला. गेल्या निवडणुकीत २३ जागा मिळवणा-या भाजपला आता केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. राज्यात महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने ३० जागांवर मुसंडी मारली आहे. यात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा राज्यात दारुण पराभव झाला आहे. या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली.

फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडू नये, यासाठी भाजप नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सगळ्यांचं जे काही यश-अपयश आहे, ती आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR