बीड : राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे आकस्मिक निधन झाले आहे. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
अंजली दमानिया यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करून खळबळजनक आरोप केला आहे. सोमवारी राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे आकस्मिक निधन झाले. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अजून अस्पष्ट आहे.
राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपनीत डायरेक्टर आहेत ही आत्महत्या आहे असे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे पण तो नैसर्गिक मृत्यू आहे असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. ‘‘राजेंद्र घनवट, जे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. कारण स्पष्ट नाही असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
राजेंद्र घनवट यांच्यावर शेतक-यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप आहे. या जमीन व्यवहाराची चौकशी व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महसूल मंत्र्यांकडे मागणी केली आहे. आज पुणे शहरातील औंध येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अन्त्यसंस्कार होणार आहेत.