मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे.तर मुंबईसह उपनगरात चार दिवस वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदभार्तील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे कोकण आणि मराठवाड्यातील बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.