29.1 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार

मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार

सातही धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. आधी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांवर आता पाणी टंचाईचे संकट आले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मे महिना सुरूच होताच तीव्र पाणी टंचाईच्या झळा लागण्यास सुरूवात झाली आहे. राज्यातील सर्वच धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे. महत्वाचे म्हणजे मुंबईवर देखील पाणीकपातीची टांगती तलवार आहे. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीबाणीचा सामना करावा लागू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही धरणांमधील पाणीसाठा २३ टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे मुंबईत पाणी कपात केली जाऊ शकते. पण अद्याप मुंबई महानगर पालिकेने याबाबत काही निर्णय घेतला नाही. पण येत्या १५ मेपर्यंत सर्व धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

मुंबईला तानसा, भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा आणि मध्य वैतरणा या ५ धरणांमधून तर तुळशी आणि विहार या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. मुंबई शहराला या सातही जलाशयांमधून दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सातही जलाशयामधून वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी १४, ४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. पण यावर्षी या सातही जलाशयांमध्ये ४,११,३५५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणा-या सातही जलाशयांमध्ये कमी पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. ज्यात भातसा आणि अप्पर वैतरणातून हा साठा घेण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR