24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बांबू टास्क फोर्स  

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बांबू टास्क फोर्स  

लातूर : प्रतिनिधी
राज्यामध्ये बांबू लागवडीस प्रोत्साहन देऊन त्याचा वेळोवळी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. २० जणांची ही समिती आहे. यामुळे राज्यात बांबू लागवडीस गती येईल, असा विश्वास टास्क फोर्सचे सदस्य, बांबू लागवड चळवळीचे प्रणेते, राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला.
टास्क फोर्समध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे सहअध्यक्ष आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, जलसंधारण मंत्री संजय राठोड, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे या मंत्र्यांचाही समावेश आहे. पाशा पटेल, महसूल, वने, नगर विकास, ग्रामविकास, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, जलसंधारण, आदिवासी विकास, कृषी आणि पदुम विभागाच्या सचिवांचाही यामध्ये समावेश आहे. रोजगार हमी आणि नियोजन विभागाचे प्रधान सचिव सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना दुष्काळ आणि अवकाळी पाऊस, अशा दुहेरी संकटांना सामोरे जावे लागत आहे. बांबू हे कमी पाण्यावर येणारे, जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणारे पीक असल्यामुळे पर्यावरणस्नेही आहे. राज्यभरात बांबू लागवड केल्यास वातावररणीय बदलाच्या संकटाला तोंड देण्याबरोबरच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतक-याला उदरनिर्वाहाचे साधन उपल्बध होणार आहे.  टास्क फोर्समुळे शाश्वत शेती विकासाचे पर्व सुरु होणार आहे. टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे प्रयत्न आहेत, असे पाशा पटेल म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR