15.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeमहाराष्ट्रमुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द

पुणे : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पावसाच्या सावटामुळे पंतप्रधानांचा हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण होणार आहे.

तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे भूमिपूजनही होणार होते. पुण्यातील विविध विकासकामांचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण पार पडणार होते. तसेच आज संध्याकाळी त्यांची एसपी कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा देखील होणार होती. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण दौरा होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे आता मोदींचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते. अवघ्या २ महिन्यांवर आलेल्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले असून राष्ट्रीय नेतृत्वांचेही महाराष्ट्र दौरे सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे महाराष्ट्रात अनेकदा आगमन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा जे. पी. नड्डा असोत, काही दिवसांत ते महाराष्ट्रात येऊन गेले आहेत.

आज पुन्हा पंतप्रधान मोदी पुण्याच्या दौ-यावर येणार होते. पुणे मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे तसेच विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार होते. तसेच पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. तेथे ते पुणेकरांना संबोधित करणार होते. मात्र त्यांच्या या सभेवर पावसाचे सावट घोंघावत होते. त्यामुळे अखेर मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पुढील आठवड्यात त्यांचा हा दौरा पुन्हा नियोजित केला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR