मुंबई : व्यापार प्रतिनिधी
स्वित्झर्लंड सरकारच्या निर्णयामुळे आता भारतीय बाजारात असलेले नेस्लेचे उत्पादन मॅगी आणि इतर मिल्ड प्रॉडक्ट महाग होण्याची शक्यता बळावली आहे. वाढलेला कराचा भार कंपन्या ग्राहकांकडून वसूल करणार आहेत.
‘मम्मी भूख लगी है, बस दो मिनट’, अशी जाहिरात करुन घराघरात स्थान मिळवणारी मॅगी महाग होण्याची शक्यता आहे. लहान मुले असो की बॅचलर लोकांच्या जीवनात मॅगीने अनोखे स्थान मिळवले होते. परंतु आता ही मॅगी महाग होणार आहे, त्याला कारण भारत सरकार नाही तर स्वित्झर्लंड सरकार आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या एका नियमामुळे मॅगी महाग होणार आहे.
मॅगी महाग होण्याचे कारण भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये १९९४ मध्ये झालेला एक करार आहे. डबल टॅक्सेशन अवॉइडेंस एग्रीमेंट नावाचा हा करार आहे. त्यात मोस्ट-फेवर्ड-नेशन (एमएफएन) नियम आहे.