जळकोट : प्रतिनिधी
गत दहा वर्षांमध्ये शेतक-यांंच्या मालाला व्यवस्थित भाव मिळालेला नाही , गरज नसताना मोदी सरकारने परदेशातून खाद्यतेल आयात केले, यामुळे २०१४ साली जे सोयाबीनचे भाव होते तेच भाव आजही आहेत. कापसाच्या बाबतीतही अशीच स्थिती आहे. बाहेर देशातून खाद्य तेलाची आयात करण्याची काहीच गरज नव्हती परंतु शेतक-यांंच्या पदरामध्ये चार पैसे पडत असताना मोदी सरकारने खाद्यतेल आयात केले आणि भारतामध्ये सोयाबीनचे भाव कमी झाले. यामुळे एक प्रकारे शेतक-यांंची आर्थिक कोंडी झाली आहे, असे प्रतिपादन महाराष्ठÑ विकास आघाडीचे उमेदवार डॉ शिवाजीराव काळगे यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी जळकोट तालुक्यातील जगलपूर, वांजरवाडा, माळीपरगा, मंगरूळ, घोणशी, अतनूर, आदी गावांना भेटी दिल्या यावेळी उपस्थित गावातील मतदारांशी त्यांनी हितगुज केले. यावेळी प्रत्येक गावामध्ये मतदारांनी उत्स्फूर्तपणे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजीराव काळगे यांचे स्वागत केले.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मन्मथ किडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, साखर कारखान्याची व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, काँग्रेसच्या युवा नेत्या प्रीतीताई भोसले, मधुकर एकुर्ककर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील, माजी जि. प. सदस्य बाबुराव जाधव, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडे, बाजार समितीचे संचालक दत्ता पवार, माजी सभापती व्यंकटराव केंद्रे, बाजार समितीचे उपसभापती संतोष तिडके, माजी सरपंच धनंजय शेळके, माजी सभापती बालाजी ताकबीडे, गणपतराव धुळशेट्टे, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर बेंबरे, मागासवर्गीय काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कांबळे, सरपंच लोहकरे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मेहताब बेग, अल्पसंख्यांक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नूर पठाण, जळकोट काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, शरद पवार गटाचे नेमीचंद पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख मुक्तेश्वर पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज दळवे, शंकर धुळशेट्टे, परमेश्वर धुळशेट्टे, आशिष पाटील राजूरकर, सुरज गिते, पांचाळ, यांच्यासह संबंधित गावातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच नेते मंडळी उपस्थित होते . याप्रसंगी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.