26 C
Latur
Wednesday, February 12, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमोदींना हरविण्यासाठी अमेरिकेने केले प्रयत्न; मोदी पोहोचण्यापूर्वी निवृत्त अधिका-याचा दावा

मोदींना हरविण्यासाठी अमेरिकेने केले प्रयत्न; मोदी पोहोचण्यापूर्वी निवृत्त अधिका-याचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स, अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. मोदी अमेरिकेत पोहोचण्यापूर्वी अमेरिकेच्या एका बड्या निवृत्त अधिका-याने मोठा दावा केला आहे. यामुळे भारताच्या राजकारणात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडण्याची शक्यता आहे. मोदींना हरविण्यासाठी अमेरिकेने कारस्थाने रचल्याचा दावा निवृत्त अधिकारी माईक बेंझ यांनी केला आहे.

अमेरिकी परराष्ट्र विभागाचे अधिकारी माईक बेंझ यांनी हा दावा केला आहे. अमेरिकेने भारतातील अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ केली होती, यासाठी भरमसाठ पैसा खर्च केला आहे. मीडिया, सोशल मीडिया सेंसॉरशिप आणि विरोधकांच्या आंदोलनांना आर्थिक मदतीच्या माध्यमातून भारताचा राजकारणावर परिणाम करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या संबंधीत संस्थांनी लोकशाहीला पाठबळ देण्याच्या कथित अजेंड्याखाली निवडणूक प्रभावित करणे, सरकार अस्थिर करणे आणि आपल्याला हवे तसे सरकार बनविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप बेंझ यांनी केला आहे.

अमेरिकेच्या सरकारने सोशल मीडियावरून मोदींचे समर्थन करणारा कंटेंट रोखण्याचा प्रयत्न केला. फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूब आणि ट्विटर सारख्या कंपन्यांवर यासाठी दबाव टाकण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना हाताशी धरून भारत गंभीर संकटाचा सामना करत असल्याचा रिपोर्ट तयार करवून घेण्यात आला.

बेंझ यांचा दावा हा २०२५ च्या लोकसभा निवडणुका नाही तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळचा आहे. ‘युएसएड’सारख्या संस्थांचे नाव त्यांनी घेतले आहे. या संस्थांनी भाजपा आणि मोदी यांच्या विरोधात निवडणुकीत नॅरेटिव्ह सेट केले होते. सोशल मीडियावर त्यांची एक मुलाखत पोस्ट करून बेंझ यांनी हा दावा केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR