24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरमोबाईल टॉवरचे एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट नाही

मोबाईल टॉवरचे एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट नाही

लातूर : एजाज शेख  
शहरातील रहिवासी क्षेत्रात झपाट्याने वाढणा-या मोबाइल टॉवरच्या जाळ्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शहरवासी मोबाइल टॉवरपासून निघणा-या विकिरणांच्या तोंडी येत असून यामुळे अनेकांना नानाविध प्रकारचे विकार होण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत मात्र सर्वांनीच कानावर हात आणि डोळ्यावर पट्टी ठेवली असल्याचे दिसते. वाढत्या जागतीकिकरणात एकेकाळी प्रतिष्ठेचा मानला जाणारा मोबाइल आता अगदी सामान्यांचाही उत्सुकतेचा विषय राहिलेला नाही. सर्व ग्राहकांना चांगली सेवा मिळावी. या स्पर्धेत जागतिक दर्जाच्या मोबाइल कंपन्यांनी टॉवरची उभारणी केली आहे. लातूर शहरात १५० पेक्षा जास्त मोबाइल टॉवर आहेत. परंतु, या मोबाईल टॉवरची आजपर्यंत एकदह्याही स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. खाजगी इमारतींवर उभे हे मोबाईल टॉवर नागरिकांच्या डोक्यावर टांगती तलवारच माणली जात आहे.
लातूर शहरात लातूर शहर महानगरपालिकेचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’आणि ‘डी’, असे चार झोन आहेत. ‘ए’ झोनमध्ये ५६, ‘बी’ झोनमध्ये ३७, ‘सी’ झोनमध्ये ३७ आणि ‘डी’ झोनमध्ये २० असे एकुण १५० विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर उभारण्यात आलेले आहेत. या मोबाईल टॉवरच्या उभारणीस लातूरच्या नगर रचना विभागाने १५ ते २० वर्षांपुर्वी परवानगी दिली. विविध मोबाईल कंपन्यांचे मोबाईल टॉवर शहरातील इमारतींच्या गच्चीवर उभारण्यात आले. या मोबाईल टॉवरची उभारणी झाल्यापासून नगर रचना विभागाने एकदाही स्ट्रक्चरल ऑडिट केले नाही. ज्या इमारतींच्या गच्चीवर मोबाईल टॉवर उभे आहेत सद्य:स्थितीत त्या इमारतींची दुरावस्था आहे. मोबाईल टॉवरचे फाऊंडेशन खिळखीळे झालेले आहेत. मोेबाईल टॉवरला नगर रचना विभागाने परवानगी दिली आणि फाईल बंद केली.  होर्डिंगसारखाच मोबाईल टॉवरचाही विषय असून इमारतीच्या गच्चीवरुन मोबाईल टॉवर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याविषयाकडेही गांभीर्याने पाहाण्याची आश्यकता आहे.
गच्चीवर मोबाइल टॉवर लावण्यासाठी घर किंवा गच्ची उपलब्ध करुन देणा-यांना महिन्याकाठी १५ ते २० हजार रुपयांचे मासिक उत्पन्न मिळते. ताजा पैसा मिळत असल्याने मोबाइल टॉवरमुळे भविष्यात आपण किंवा आपल्या कुटुंबीयांना काय नुकसान होऊ शकते याकडे मात्र कानाडोळा करण्यात येतो.  मोबाइल टॉवर असलेल्या घरात एक मंद आवाज सतत सुरु असतो. या घरात प्रवेश केल्यावर नवीन व्यक्तीस त्याची जाणीव होते. मात्र, सरावाचा भाग झाल्याने गच्ची मोबाइल टॉवरसाठी भाड्याने देणा-यांना याची जाणीव होत नाही. जास्तवेळ मोबाइल टॉवरच्या सानिध्यात राहिल्यास मात्र कालांतराने किडनी, -हदय किंवा शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होतो, याबाबत जनजागृतीची गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR