24 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeअंतरराष्ट्रीयमोरया... चा गजर करीत मोदींनी वाजवला ढोल!

मोरया… चा गजर करीत मोदींनी वाजवला ढोल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सिंगापूरला पोहोचले, तिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी मोदी ‘गणपती बाप्पा मोरया…’ म्हणत ढोल वाजवताना दिसले. ब्रुनेईचा दौरा पूर्ण केल्यानंतर भारताचे पंतप्रधान आता स्ािंगापूरला पोहोचले आहेत.

पंतप्रधान मोदी स्ािंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आणि राष्ट्रपती थर्मन शानमुगरत्नम यांची भेट घेतील आणि सिंगापूरच्या नेतृत्वाशी संवाद साधतील. मात्र सध्या मोदींचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सिंगापूरमध्ये लोकांनी मोदींचे जोरदार स्वागत केले. एका महिलेने पंतप्रधानांना राखीही बांधली आणि अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली. पंतप्रधान मोदी ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करत आहेत त्या हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला त्यांनी ऑटोग्राफही दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR