21.1 C
Latur
Monday, November 11, 2024
HomeUncategorizedम्हसवे शिवारात गॅस सिलिंडरचा स्फोट

म्हसवे शिवारात गॅस सिलिंडरचा स्फोट

जळगाव : म्हसवे शिवारात (ता. पारोळा) येथे तीन ते चार गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तर दोन चारचाकी (ओमनी) जळून खाक झाला. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तर दोन चारचाकी (ओमनी) जळून खाक झाला.

पारोळा शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या म्हसवे शिवारात शुक्रवारी (ता.१९) रात्री साडेनऊला दोन ओमनींमध्ये अवैधरीत्या गॅस भरणा-या स्टेशनवर गॅस भरण्यासाठी आल्या होत्या. गाडींमध्ये गॅस भरत असताना अचानक स्फोट झाला. यात दुकानात असलेले तीन ते चार सिलिंडर देखील फुटले तर गॅस भरण्यासाठी आलेल्या दोन्ही ओमनी जळून खाक झाल्या.हा स्फोट एवढा भीषण होता की त्याचा आवाज दूरवर पोचला. त्यामुळे गावातील लोक भयभीत झाले.

गॅस सिंिलडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच पारोळा येथील अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला त्यातील मनोज पाटील व त्यांच्या सहका-यांनी तत्काळ घटनास्थळी ओमनीला लागलेली आग आटोक्यात आणली.आग विझल्यानंतर अग्निशमन दलाने याठिकाणी असलेल्या सुमारे २० ते २५ गॅस सिंिलडर ताब्यात घेतले. जळून खाक झालेल्या गाड्यांमध्ये अवैधरीत्या गॅस कोण भरत होते. ही वाहने कोणाची होती. हे मात्र समजले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR