25 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeक्रीडायुवा क्रिकेटपटू मुशीर खानचा अपघात

युवा क्रिकेटपटू मुशीर खानचा अपघात

नवी दिल्ली : क्रिकेटर सरफराज खानचा भाऊ युवा क्रिकेटपटू मुशीर खान याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. लखनौहून कानपूरला जात असताना मुशीरची कार उलटली असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मुशीर जखमी झाला असून, त्याच्या मानेला फ्रॅक्चर झाले आहे. अपघाताच्या वेळी मुशीरसोबत त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खानही होते. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे क्रीडाविश्वात चांगलीच खळबळ माजली आहे. दरम्यान, या अपघातामुळे झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी मुशीरला बराच काळ लागणार असून, तो लवकर मैदानात परतू शकणार नसल्याचे मानले जात आहे.

मुशीरला पूर्णपणे बरे होण्यासाठी जवळपास ६ आठवडे ते ३ महिन्यांचा कालावधी लागू शकतो अशा परिस्थितीत मुशीरला इराणी चषकातून माघार घ्यावी लागणार आहे. इराणी चषकाचा सामना पुढील महिन्यात १ ऑक्टोबरपासून लखनौच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. याशिवाय मुशीर रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमधूनही बाहेर राहू शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मुशीर खान मागील काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. विशेषत: लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याने टीम इंडियासाठी दावेदारी सादर केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या दुलीप करंडक स्पर्धेत मुशीरने दमदार फलंदाजी केली होती. मुशीरने भारत अ संघातर्फे भारत ब विरुद्ध १८१ धावांची स्फोटक खेळी खेळली होती. यानंतर मुशीरची इराणी कपसाठी मुंबई संघात निवड करणयत आली होती. मात्र आता त्याला इराणी कप घेळता येणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.

मुशीर खानची आतापर्यंतची कारकीर्द

मुशीर खानने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत आतापर्यंत ९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या १५ डावांत फलंदाजी करताना त्याने ५१.१४ च्या सरासरीने ७१६ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ३ शतके आणि १ अर्धशतक झळकावले आहे, ज्यामध्ये त्याने नाबाद २०३ धावा केल्या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR