27.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeपरभणीयेलदरी जलाशयातील पाणीसाठा पोहचला ५६ टक्केवर

येलदरी जलाशयातील पाणीसाठा पोहचला ५६ टक्केवर

परभणी : पूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पातून मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा उचलून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे जिंतूर तालुक्यातील येलदरी प्रकल्पात मंगळवारी सायंकाळ पर्यंत ५६.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

खडकपूर्णा प्रकल्पाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पात सद्यस्थिती ९२.२३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पाटबंधारे खात्याने १९ क्रमांकाचे द्वारे ०.५० मीटरने उचलून १२९३.१८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु केला. धरणात पाण्याची होणारी आवक ओळखून विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कारवाई केली जाईल असे नमूद केले.

नदीपात्रातील पाण्याच्या विसर्गामुळे येलदरी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून ५६.३२ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या जलाशयात वरच्या भागातून पाण्याची आवक सुरुच राहील्यास लवकरच धरण पूर्ण क्षमतेने भरू शकेल. हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR