24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्ररवी राणा यांचा मोठा विजय ; नवनीत राणा यांना आनंदाश्रू

रवी राणा यांचा मोठा विजय ; नवनीत राणा यांना आनंदाश्रू

अमरावती : प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा मतदार संघात महायुती पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचे असता निश्चित झाले आहे. त्यातच आता रवी राणा यांच्या विजयाची बातमी समोर आली आहे. त्यांनी बडनेरा विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये विजय मिळवला आहे.

रवी राणा यांना ४००३५ एवढी मत मिळाली आहेत. रवी राणा यांचा २१६४२ मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मतांनी आघाडी घेतली आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.

त्यांच्या विजयानंतर नवनीत राणा यांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी नवनीत राणा यांनी भन्नाट डान्सही केला.

नवनीत राणा यांनी रवी राणा यांच्याकडे पाडव्याच्या ओवाळणीला आमदारकी मागितली होती. रवी राणा यांच्या विजयानंतर नवनीत राणा यांना अश्रूही अनावर झाले होते. पण आता नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसोबत जल्लोषही केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR