मुंबई : प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ‘वर्षा’ निवासस्थानी ही भेट झाली आहे. मात्र या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वार ेअवघ्या पंचवीस मिनिटांत पाकिस्तानातील नऊ ठिकाणचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ज्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. मात्र राज ठाकरे यांनी दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, असे विधान केले होते.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘‘राज ठाकरे काय म्हणतात याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत देश या कारवाईच्या पाठिशी उभा आहे. या कारवाईचे स्वागत करतो आहे. संपूर्ण जग भारताची वाहवा करत आहे आणि भारताच्या पाठिशी जग उभे आहे,’’ असे सांगितले. त्यानंतर आता दोघांचीही भेट झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय अंदाज बांधले जात आहेत.