मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भेट ही चर्चेचा विषय ठरते आहे. अशामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी (ता. २३ सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अचनाकपणे भेट घेतली. त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. लोकसभेत महायुतीला पाठींबा देणा-या मनसेने राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, सोमवारीच (ता. २३ सप्टेंबर) मनसेच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक बोलावली होती. पण अचानकपणे ही बैठक सोडून राज ठाकरेंनी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय गोटात चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी त्यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. पण या भेटीत काही राजकीय चर्चा झाली का? किंवा विधानसभा निवडणूकीबाबत काही चर्चा झाली का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.