22.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्रराजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडे

मुंडेंनी फडणवीस-पवारांच्या कोर्टात ढकलला चेंडू

मुंबई : संतोष देशमुख हत्या आणि दोन कोटींच्या खंडणी प्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या भोव-यात सापडले आहेत. संतोष देशमुखांच्या हत्येचे प्रकरण समोर आल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. दिल्ली दौ-यावर असताना पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना मंत्रि­पदाच्या राजीनाम्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी राजीनाम्याच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात ढकलला.
धनंजय मुंडे दिल्ली दौ-यावर आहेत. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याशी संबंधित प्रश्नासंदर्भात केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आमदार संदीप क्षीरसागर म्हणताहेत की, वाल्मिक कराडच्या जवळचे आहात. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या जवळचे आहात, त्यामुळे तुमचा राजीनामा होणार नाही, असा प्रश्न धनंजय मुंडेंना विचारण्यात आला.

मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, याबाबतीत धनंजय मुंडे या सर्व गोष्टींमध्ये मुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस), उपमुख्यमंत्र्यांना (अजित पवार) कुठे जर दोषी वाटत असतील, तर त्यांनी राजीनामा मागावा; मी राजीनामा देणार. पण, फक्त हा विषय काढून राजीनामा होत असेल, याबाबतीत मी दोषी आहे की नाही; हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगू शकतील. त्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत ना, अशी भूमिका धनंजय मुंडेंनी मांडली.

वरिष्ठांनी मला सांगावे -धनंजय मुंडे
नैतिकता म्हणून राजीनामा देऊन चौकशी होईपर्यंत बाजूला राहायला पाहिजे का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या प्रश्नाला उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले, ‘माझी नैतिकता माझ्या लोकांबद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडलीय, त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय, ते अतिशय प्रामाणिक आहे. त्यामुळे मला स्वत:ला नैतिकतेने वाटत नाही. त्यामुळे माझा दोष सांगावा लागेल. माझ्या वरिष्ठांनी सांगावा लागेल. तेच माझं म्हणणं आहे’, असे भाष्य धनंजय मुंडे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR