पुणे : राज्यात यंदाच्या ऊस गाळप हंगामात २०७ खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी मिळून आतापर्यंत ९६६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. या गाळपातून आतापर्यंत ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
तर सरासरी साखरेचा उतारा १०.११ टक्के इतका मिळाला आहे. राज्यात आतापर्यंत ३३ कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली असून सर्वाधिक ९ कारखाने सोलापूर विभागातील तर संभाजीनगर विभागातील ८ कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर विभागाने आतापर्यंत २५ लाख टन साखर उत्पादित केली असून या विभागाचा सरासरी साखर उतारा सर्वाधित ११.४५ इतका आला आहे.
राज्यात यंदा २०७ सहकारी व खाजगी कारखान्यांनी रोजगार परवाना घेतला होता त्यातील त्यात १०३ सहकारी व १०४ खाजगी साखर कारखाने होते. या साखर कारखान्यांनी आतापर्यंत ९६६.८२ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ९७.७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.११ इतका आला आहे. सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागात ११.४५ टक्के असून त्या खालोखाल पुणे विभागाचा साखर उतारा १०.३९ टक्के इतका आहे. नांदेड विभागात यंदा विक्रमी १०.०९ टक्के साखर उतारा आला आहे.
कोल्हापूर विभागाने आतापर्यंत २२३ लाख टन ऊस गाळपापासून २५.६ लाख टन साखर उत्पादित केली आहे. पुणे विभागात २०४ लाख उसाच्या गाळपापासून २१.२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्या खालोखाल सोलापूर विभागाने देखील २०१ लाख उसाचे गाळप करून १८.७ लाख टन साखर उत्पादित केली आहे. सोलापूर विभागाचा सरासरी साखर उतारा ९.२८ टक्के इतका आहे. नगर विभागात १२४ लाख टन उसाचे गाळप झाले असून त्यातून १२.४ लाख टन साखर तयार झाली आहे. नगर विभागाचा साखर उतारा ९.१९ टक्के इतका आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातून ९० लाख टन उसाच्या गाळपामधून ७.९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर साखर उतारा ८.८ टक्के इतका आहे.
नांदेड विभागात १०९ लाख टन गाळपातून ११ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. या विभागाचा साखर उतारा १०.०९ टक्के इतका आहे. अमरावती विभागात ९ लाख टन ऊस गाळपातून ८ लाखकिं्वटल साखर उत्पादित झाली आहे. या विभागाचा साखर उतारा ९.२६ टक्के इतका आहे. सर्वात कमी तीन लाख टन उसाचे गाळप नागपूर विभागात करण्यात आले असून येथे केवळ १.९३ लाखकिं्वटल साखर उत्पादित झाली आहे. राज्यात सर्वात कमी केवळ ५.४१ टक्के साखर उतारा नागपूर विभागाचा आहे.