31.2 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’

राज्यात दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’

मुसळधार पावसासह गारपिटीचे संकट हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट जाण्यास तयार नाही. मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागांत अवकाळी पाऊस झाला. आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ६ आणि ७ मे रोजी जोरदार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

दरम्यान, राज्यात पुढील ४८ तासांत सर्वत्र वादळी वा-यासह गारपीट होणार आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात पुढील चार ते पाच दिवसांत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. याशिवाय कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात आणि विशेष करून विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने गारपीट सुरू आहे. आता येत्या २४ तासांत विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात आणि विशेष करून विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने गारपीट सुरू आहे. आता येत्या २४ तासांत विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून जालना जिल्ह्यात आगामी तीन दिवस वादळी वा-यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वा-याच्या परिणामामुळे राज्यावर सध्या पावसाचे सावट आहे. विदर्भात काही ठिकाणी ४०-५० कि.मी. प्रतितास वेगाने वादळी वारे वाहू शकतात. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR