28.6 C
Latur
Saturday, March 15, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात धुळवडीला गालबोट; विविध घटनांत १५ ठार

राज्यात धुळवडीला गालबोट; विविध घटनांत १५ ठार

मुंबई : प्रतिनिधी
होळीच्या दुस-या दिवशी धुळवटीनिमित्त राज्यभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण होतं. सोसायट्यांमध्ये एकत्र येत आनंदाने होळी साजरी केली जात होती. नागरिकांनी डीजेचा ठेका धरला होता. मटणाच्या दुकानाबाहेर एक ते दीड किलोमीटर रांगाही लागल्या होत्या. सर्वत्र आनंदाचं वातावरण असताना सणाला गालबोल लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

इंद्रायणी नदीत पोहायला गेलेल्या ४ जणांचा, बदलापुरातील उल्हास नदीत ३ जणांचा, वसईत अपघातादरम्यान २, गडचिरोलीत १, नागपुरात १, छत्रपती संभाजीनगरमध्ये २ आणि वसईत झालेल्या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात आनंद साजरा केला जात असताना राज्यातील १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, धुळवड साजरी केल्यानंतर नदीत पोहायला गेलेल्या सात तरुणांचा हकनाक मृत्यू झाला. देहुरो ड जवळील किन्हई गावाजवळील इंद्रायणी नदीच्या पात्रात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्य झाला आहे. रोहित गौतम कांबळे, विशाल दिलीप अचमे, आकाश विठ्ठल गोरडे अशी या दुर्घटनेतील मृतांची नावं आहेत. घरकुल चिखलीहून ४ ते ५ तरुण हे धुळवट खेळण्यासाठी या परिसरात आले होते. दुपारी इंद्रायणी नदीच्या पात्रात पोहत असताना यातील तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देहूरोड पोलिसांनी दिली आहे.

दुस-या घटनेत धुळवड खेळून झाल्यानंतर रंग धुण्यासाठी म्हणून चार तरुण बदलापुरातील उल्हास नदीत गेले होते. पण नदीत उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा काही एक अंदाज आला नाही. एका मागो माग हे चार ही तरुण नदीच्या पाण्यात बुडाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आर्यन मेदर, आर्यन सिंग, सिद्धार्थ सिंग आणि ओमसिंग तोमर अशी या चौघांची नावं आहेत. विशेष म्हणजे हे चौघे ही अवघ्या पंधरा सोळा वर्षांचे आहेत.
तिस-या घटनेत प्रल्हाद व मनोज दोघे होळी दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी ढेकाले येथे गेले होते. होळीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुचाकी वरून घरी परत येत होते. त्यांचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघात झाला यातच दोघे ठार झाले.
तर चौथ्या घटनेत देसाईगंज शहरातील एका १९ वर्षीय युवकाचा देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.अथर्व हिवराज सहारे वय १९ वर्षे असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे.

तर नागपूर जिल्ह्यातील बूटीबोरी येथे उड्डाणपुलावरून कार कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बूटीबोरी – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बूटीबोरी येथील टी-पॉईंटवर घडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR