18.6 C
Latur
Saturday, November 9, 2024
Homeराष्ट्रीयराज्यात महाविकास आघाडीच प्रबळ

राज्यात महाविकास आघाडीच प्रबळ

ओपिनियन पोल, आघाडीला मिळू शकतात २६ ते २८ जागा

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सी व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार महायुतीला १९ ते २१ जागा तर महाविकास आघाडीच्या पारड्यात २६ ते २८ जागा पडण्याचा अंदाज आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची साथ असूनही महायुतीला फारसे यश मिळताना दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या ओपिनियन पोलनुसार महायुतीला ३७ टक्के आणि महाविकास आघाडीला ४१ टक्के मते मिळू शकतात.

देशातील लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. तीन ते चार महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. भाजप आणि काँग्रेससह देशभरातील इतर पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली. यादरम्यान सी-व्होटरने सर्वेक्षण केले. लोकसभेच्या निवडणुका आज झाल्या तर कोणाचा विजय किंवा पराभव झाला असता असा प्रश्न विचारण्यात आला. देशातील ५ मोठ्या राज्यांतील जनमत चाचण्यांचे आकडे धक्कादायक आहेत. पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांचा समावेश करून लोकसभेच्या एकूण २२३ जागा आहेत. या जागांवरच्या विजयामुळे देशात कोणाची सत्ता येणार हे ठरते. या राज्यांतही इंडिया आघाडीच प्रबळ ठरत आहे.

महाविकास आघाडीला फायदा
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. ओपिनियन पोलमध्ये काँग्रेस आघाडीचा वरचष्मा दिसत आहे. आज जर महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक झाली तर भाजप+आघाडीला १९ ते २१ जागा मिळतील तर काँग्रेस आणि मित्र पक्षाला २६ ते २८ जागा मिळतील तर इतरांना ०-२ जागा मिळतील, असा अंदाज आहे. मतांच्या टक्केवारीनुसार भाजप आघाडीला ३७ टक्के, काँग्रेस आणि मित्रपक्षाला ४१ टक्के आणि इतरांना २२ टक्के मते मिळू शकतात.

चार राज्यांतील ओपिनियन पोल

पंजाबमध्ये कॉंग्रेसला लाभ
पंजाब : लोकसभेच्या १३ जागा : आज निवडणुका झाल्या तर भाजपला २, काँग्रेसला ५-७, आपला ४-६ जागा आणि शिरोमणी अकाली दलाला २ जागा मिळाल्या असत्या.
प. बंगालमध्ये तृणमूल
प. बंगाल : एकूण जागा ४२ : यात तृणमूल काँग्रेसला २३ ते २५, भाजपला १६-१८ जागा आणि काँग्रेस आघाडीला ०-२ जागा मिळाल्या असत्या.

बिहारमध्ये आघाडी
बिहार : एकूण ४० जागा : येथे काँग्रेस आघाडीला २१ ते २३, भाजपला १६-१८ जागा आणि इतरांना २ जागा मिळाल्या असत्या.

यूपीत भाजप
उत्तर प्रदेश : ८० जागा : यात एनडीएला ७३-७५,, काँग्रेस+सपाला ४-६ जागा आणि बसपाला ०-२ जागा मिळाल्या असत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR