मुंबई : धारावीमधील मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी महापालिकेचे पथक शनिवारी धारावीत गेले होते. यावेळी पालिकेच्या पथकाला तेथील नागरिकांनी कारवाई करण्यापासून रोखले असून पालिकेच्या वाहनांवर दगडफेक देखील केल्याचे समोर आले होते. धारावीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाविषयी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. भाजपा सत्तेत असल्यावरच राज्यात वाचाळवीर तयार होतात, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दरम्यान, धारावीच्या परिसरामध्ये एक मशीद आहे. या मिशिदीचा काही भाग अवैध असल्याचे सांगितले जात होते. त्या मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी पालिकेचे पथक शनिवारी धारावीमध्ये पोहोचले होते. मशिदीवरील कारवाईमुळे धारावीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाविषयी सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते संविधानाच्या विरोधात बोलतात तसेच काहीही बोलून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करतात,
या राज्याचे गृहमंत्री त्यांची पाठराखण करतात हे खरंच दुर्दैवी आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. तसेच अजित पवार कोणाला तिकिट देणार हा त्यांचा अंतर्गत विषय आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.