21.3 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात १०० टक्के अपक्षांचे सरकार : बच्चू कडू यांचा दावा

राज्यात १०० टक्के अपक्षांचे सरकार : बच्चू कडू यांचा दावा

अमरावती : विशेष प्रतिनिधी
राज्यात महाविकास आघाडी अथवा महायुतीचे नाही तर अपक्षांचे सरकार येईल असे बच्चू कडू यांना वाटत आहे. राज्यात १०० टक्के अपक्षांचे सरकार येईल असा दावा त्यांनी केला. अपक्ष आणि छोट्या पक्षांचे सरकार येईल, शंभर टक्के येईल. एक तर मोठ्या पक्षांना अपक्ष बाहेरून पाठिंबा देतील अथवा अपक्षांच्या सरकारमध्ये आताचे बडे पक्ष सामील होतील असा दावा त्यांनी केला. यंदा राज्यात खिचडी सरकारचा प्रयोग होण्याचे मोठे संकेत बच्चू कडू यांनी दिले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत महा-मुकाबला होत आहे. दोन्हीकडील तीन पक्ष आणि घटक पक्षांना घेऊन सर्वच जण मैदानात उतरले आहेत. राज्यात कुणाचे सरकार येणार याविषयी दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.

रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या टीकेवर उत्तर देताना त्यांना एक दिवस लक्षात येईल आणि ते माझ्याबद्दल चांगले बोलायला लागतील, असा दावा त्यांनी केला. रवी राणा हे त्यांचा पक्ष वाढवत आहेत. त्यांनी पद्धतशीरपणे भाजप कमी केली आहे. येथील अनेक मोठ्या नेत्यांची भाजपमधून हाकलपट्टी झाली आहे. ज्यांनी पक्षासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या ते भाजपचे नेते दयनीय अवस्थेत आहेत. तर आता राणा दाम्पत्याने भाजपा संपवल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी डॉ. अनिल बोंडे यांच्यावर खरपूस टीका केली.

जोडेंगे और जितेंगे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बटोगे तो कटोगे या विधानाचा त्यांनी खरपूस समाचार घेत ‘जोडेंगे और जितेंगे’ हा आमचा नारा असल्याचे ते म्हणाले. आमच्यावर अजून तरी असं जातीच्या आधारावर राजकारण करण्याची वेळी आली नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR