औसा : प्रतिनिधी
राज्यातील हातभट्टीची दारु ही विषारी दव्यात समावेश करुन याबाबत सुनिश्चिीत कार्यवाही करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी दि. २३ जानेवारी रोजी मंंबई येथे गृहराज्यमंत्र्यासह संबधित विभागाच्या प्रमुख अधिका-यांची बैठक आयोजित करण्यात करण्यात आली आहे.
अवैध, बनावट व विषारी दारुवक्रिीला आळा बसावा आणि हातभट्टीची विषारी द्रव्यात समावेश व्हावा अशी मागणीही त्यांनी लक्षवेधीद्वारे सरकारकडे केली होती. त्याच लक्षवेधीच्या अनुषंगाने अवैध व विषारी दारू विक्री प्रतिबंध संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक झाली होती. पार पडलेल्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले होते पण मागच्या १० महिन्यांमध्ये अपेक्षित कार्यवाही झालेली नाही.त्यामुळे यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे बैठकीची मागणी आ पवारांनी केली होती. सध्याच्या कायद्यात अवैध दारूविक्रीचा गुन्हा सिद्ध झाल्यास ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षा देण्याची तरतूद आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला न्यायालयात हजर न करता जागेवर जामीन द्यावा लागतो.
ही पोलिसांची अडचण आहे. त्यामुळे या गुन् Þात कमीत कमी ८ ते १५ वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्याचा प्रस्ताव आ अभिमन्यू पवार यांनी ठेवला आहे. तसेच एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा हा गुन्हा करीत असेल तर त्या व्यक्तीला ३ जिल्ह्यातून ३ वर्षांसाठी हद्दपार करण्याचाही प्रस्ताव ठेवला आहे. अवैध दारूवक्रिीमधील गुन्ह्यात दंडाची रक्कम अत्यल्प असून त्यामुळे या गुन् Þातील व्यक्तीला आर्थिक दंड आधिक बसवा यासाठी कमीतकमी ५० हजार ते ५ लाखांपर्यंत दंडाची तरतूद करावी हातभट्टी तयार करणा-यांना व विकणा-यांना विषारी द्रव्य कायदा लागू करून त्या विरोधात कलम ३२८ नुसार कडक कारवाई करण्यात यावी असाही प्रस्ताव आ अभिमन्यू पवार यांनी सरकारकडे ठेवला आहे.
आ अभिमन्यू पवार यांनी केलेल्या मागणीनुसार राज्यात या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झाल्यास अवैध, बनावट व विषारी दारुविक्रीला आळा बसणार आहे. सदरील कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आ अभिमन्यू पवार आग्रही असून हा कायदा नक्कीच राज्यातील अवैध, बनावट व विषारी दारूविक्रीसाठी कर्दनकाळ ठरणार आहे.