पुणे: प्रतिनिधी
उसाची उपलब्धता संपल्याने राज्यातील ८ साखर कारखाने बंद झाले आहेत. एकूण आठपैकी ३ कारखाने छत्रपती संभाजीनगर विभागातील आहेत तर अन्य विभागातील प्रत्येकी एकेक कारखान्यांचा समावेश आहे. यंदाच्या गाळप हंगामात एकूण २०७ साखर कारखान्यांनी हंगाम घेतला. त्यामध्ये १०३ सहकारी आणि १०४ कारखाने खासगी आहेत.
साखर आयुक्तालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार आजवर सरासरी १० टक्के साखर उतारा मिळाला असून सर्वाधिक उतारा कोल्हापूर विभागात ११.३६ टक्के मिळाला आहे. आजवर साखर उत्पादन ८८४.४९ लाख क्विंटल झाले असून उसाचे गाळप ८८४.४९ लाख मे. टन इतके झाले आहे.