मुंबई : रायगड जिल्ह्यात एक खाजगी लक्झरी बस उलटल्याने एका ३० वर्षीय प्रवाशाचा मृत्यू झाला आणि २६ जण जखमी झाले, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.
मुंबईहून कोकणाकडे जाणा-या बसमध्ये कर्नाळा येथे उतारावर ही घटना घडली, असे एका अधिका-याने सांगितले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि नंतर ती उलटली, असे त्यांनी सांगितले, तसेच गाडीत ४९ जण होते.
या घटनेत राजापूर येथील रहिवासी अमोल तळवडेकर यांचा मृत्यू झाला, तर २६ प्रवासी जखमी झाले, असे त्यांनी सांगितले. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या बस चालकाला रायगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे त्यांनी सांगितले.