15.7 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नवे चिन्ह द्या : शरद पवार

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना नवे चिन्ह द्या : शरद पवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात होणा-या विधानसभा निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्हे द्यावीत, यासाठी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सदर याचिका तातडीने सुनावणी होण्यासाठी सूचिबद्ध करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्या. सूर्यकांत व न्या. उज्ज्वल भूयान यांच्या खंडपीठाकडे केली होती. त्यानुसार ही याचिका २५ सप्टेंबरला सुनावणीसाठी सूचिबद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या ६ फेब्रुवारीच्या निर्णयाला शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

त्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना नवीन निवडणूक चिन्हे देण्यात यावीत, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली.

लोकसभा निवडणुकीपूर्वी १९ मार्च रोजी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नाव वापरण्याची परवानगी दिली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR