23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूररेणा साखर कारखान्यातर्फे दिशा प्रतिष्ठान लातूरला रुग्ण वाहिका भेट

रेणा साखर कारखान्यातर्फे दिशा प्रतिष्ठान लातूरला रुग्ण वाहिका भेट

लातूर : प्रतिनिधी
रेणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे रेणा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दिशा प्रतिष्ठान लातूरला आरोग्य तपासणी रुग्ण वाहिकेसाठीचा धनादेश कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे यांनी दिशा प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांना सुपूर्त केला.
या आरोग्य तपासणी रुग्ण वाहिकेचा उपयोग ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना होणार आहे. साखर कारखानदारीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक स्थिती सक्षम करतानाच त्या भागातील लोकांच्या आरोग्यासाठी ही चांगल्या सेवा उपलब्ध करुन देण्यात रेणा साखर कारखाना सहयोग देत आहे. या बद्दल दिशा प्रतिष्ठानच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे तसेच कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, उपाध्यक्ष आनंदराव देशमुख आणि संपूर्ण संचालक मंडळाचे आभार व्यक्त्त करण्यात आले. यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मोरे आणि दिशा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR