36.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeलातूररेणापूर, तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा

रेणापूर, तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा

रेणापूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव  देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रेणापूर शहर व  तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवार  दि १८ एप्रिल  रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.  येथील ग्रामदैवत रेणुकादेवीला अभिषेक व आरती करण्यात आली  तर महेबूब सुभानी दर्ग्याला चादर अर्पण करीत उदंड आयुष्य लाभो यासाठी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांंनी प्रार्थना केली .
 यावेळी माजी आ त्र्यंबक भिसे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव चव्हाण, लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, शहराध्यक्ष पद्मसिह पाटील, रेणा कारखान्याचे नूतन संचालक तुकाराम कोल्हे, पंडीत माने, गोविंद पाटील, बालाजी हाकेपाटील, संग्राम माटेकर, धनराज देशमुख, प्रविण पाटील , अनिल कुटवाड, स्रेहलराव देशमुख, बाजार समितीचे सभापती  उमाकांत खलंग्रे, उपसभापती शेषेराव हाके, कृउबाचे संचालक जनार्धन माने, कमलाकर आकनगिरे, विश्वनाथ कागले, प्रकाश सुर्यवंशी, सौ.पुजा इगे, प्रदिप राठोड, गजेंद्र चव्हाण, बाळकृष्ण माने, हनमंत पवार, सचिन मोटेगावकर, सचिन कोल्हे, बाळासाहेब करमुडे, भुषण पनुरे, पाशामियाँ शेख, केदार हालकुडे,  मनोहर व्यवहारे, दादाराव कांबळे,  अजय चक्रे, अतुल गोकुळे,  सचिन इगे, प्रदिप काळे, रोहित गिरी, रमेश चव्हाण, सतीश चव्हाण  आदी उपस्थित  होते.  सर्वरोग निदान शिबीर व रुग्णांना फळाच्या वाटप प्रसंगी माजी सभापती प्रदिप राठोड, कृउबाचे सभापती अ‍ॅड शेषेराव हाके, सचिन, गजेंद्र चव्हाण, प्रकाश सुर्यवंशी, विश्वनाथ कागले, पुंडलिक इगे आदी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमास  रेणापूर शहरासह  तालुक्यातील कॉग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR