29.1 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeलातूररेणापूरचे माजी उपसभापती शास्त्री चव्हाण यांच्यासह अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रेणापूरचे माजी उपसभापती शास्त्री चव्हाण यांच्यासह अनेकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर : प्रतिनिधी
रेणापुर पंचायत समितीचे माजी उपसभापती शास्त्री चव्हाण यांच्यासह अनेक युवकांनी राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत लातूर येथील आशियाना निवासस्थानी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. काँग्रेसमध्ये  प्रवेश केलेल्यांमध्ये पृथ्वीराज पाटील, चेतन लंकेश्वर, महेश भारती,  कृष्णा पारसेवार, ओमकार गोरे, संकेत कांबळे, सुमित सवई, सुयश चव्हाण यांचा समावेश आहे.
यावेळी रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती शिवराज सपताळ, रेणाचे संचालक धनराज देशमुख, माजी संचालक शिखंडी हरवाडीकर, माजी संचालक विश्वासराव देशमुख, माजी सभापती चंद्रचूड चव्हाण, धनंजय जाधव बाळासाहेब, जाधव मुकेश राजमाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR