32.5 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeमुख्य बातम्यारोबोट जवान सीमेवर लढणार; पुण्याच्या प्रयोगशाळेत निर्मिती

रोबोट जवान सीमेवर लढणार; पुण्याच्या प्रयोगशाळेत निर्मिती

पुणे : वृत्तसंस्था
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पुण्यातील प्रयोगशाळेत संशोधक एक प्रगत ुमनॉइड रोबोट विकसित करत आहेत. हा रोबोट युद्धप्रसंगी थेट सीमेवरील सैनिकी फ्रंटलाइन मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकेल.

धोकादायक आणि कठीण परिस्थितीत सैनिकांचा थेट सहभाग कमी करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी देणे हा या रोबोट सैनिकाच्या निर्मितीमागचा उद्देश आहे. यामुळे सैन्यदलाला मदतच मिळणार असून जवानांचेही रक्षण होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून संशोधन गट या रोबोटवर काम करत आहे. त्याच्या वरच्या आणि खालच्या शरीराचे स्वतंत्र प्रोटोटाईप तयार केले असून, आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये काही महत्त्वाच्या कार्यक्षमतेत टीमने यश मिळवले आहे.

या रोबोटचे सादरीकरण नुकतेच पुण्यातील ‘नॅशनल वर्कशॉप ऑन ऍडव्हान्स्ड लेग्ड रोबोटिक्स’ मध्ये करण्यात आले होते. सध्या हा प्रकल्प प्रगत टप्प्यात असून, रोबोटला मानवी आदेश समजून घेणे आणि अंमलात आणणे यात अधिक अचूकता यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

२०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार : डिझाईन टीमचे प्रमुख शास्त्रज्ञ किरण अकेला यांनी सांगितले की, संतुलन राखणे, वेगाने डेटा प्रक्रिया करणे आणि ग्राऊंड पातळीवर अचूक कार्य करणे ही सर्वात मोठी आव्हाने आहेत. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. सुरूंग निकामी करणे, बॉम्ब निकामी करण्याचे काम या रोबोटकडून करता येऊ शकते.

‘डीआरडीओ’च्या अधिका-यांनी सांगितले की, दोन आणि चार पायांचे रोबोट्स केवळ संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातच नव्हे, तर आरोग्यसेवा, गृह सहाय्य, अंतराळ संशोधन, उत्पादन क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्येही उपयुक्ततेची क्षमता बाळगतात. मात्र, हे सर्व स्वायत्त आणि कार्यक्षम रोबोट्स तयार करणे तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान आहे. अत्यंत हाय रिस्क असलेल्या परिस्थितीत हा रोबोट लष्करासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR