नगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहमदनगर जिल्ह्यात राडा झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये खासदार निलेश लंके यांच्या समर्थकाची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.
पारनेर शहरात आठ ते नऊ जणांनी राहुल झावरे यांना मारहाण केली आहे. तसेच त्यांची गाडी फोडून टाकली आहे. या मारहाणीत राहुल झावरे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, सध्या पारनेर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.