21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरलग्न पत्रिका वाटपासाठी गेलेल्या नवरदेवावर काळाचा घाला; चारचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

लग्न पत्रिका वाटपासाठी गेलेल्या नवरदेवावर काळाचा घाला; चारचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

उदगीर : प्रतिनिधी
: तालुक्यातील लोहारा-उदगीर रस्यावरील दुध डेअरीजळ बुधवारी (ता.१०) रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास करडखेलकडे जात असलेल्या एका दुचाकीला डस्टर गाडीने धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दोघा जनाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

याबाबत ग्रामीण पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास लोहारा-उदगीर या राष्ट्रीय महामार्गावर दुध डेअरी जवळील धनमाळ येथे डस्टर क्रमांक एम एच १२ एन ई ९१५३ या गाडीने पल्सर मोटारसायकल क्र एम एच २४ बी क्यु ५८५३ या दुचाकीस धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

अपघातात अनुपवाडी (ता.उदगीर) येथील विशाल भिवा निलेवाड (वय- २२) व आकाश धोंडीबा निलेवाड (वय-२३) या दोघा चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.

यातील विशाल याचे १८ एप्रिलला लग्न होते. लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी ते करडखेल येथे जाणार होते. करडखेल येथे जाण्याआधीच त्यांना लोहा-या जवळील धनमाळ येथे काळाने घाला घातला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळू उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनुपवाडी गावात शोककळा पसरली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR