अमरावती : प्रतिनिधी
थाटामाटात लग्न पार पडताच फक्त अर्ध्या तासातच नवरदेवाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. अमरावतीमधील वरुडमध्ये ही धक्कादायक घटना घडली. मृत झालेल्या नवरदेवाचे नाव अमोल गोड असे आहे. नवरदेवाचा मृत्यू झाल्याने आनंदी उत्सव सुरू असलेल्या लग्नमांडवात काही क्षणांतच शोककळा पसरली. अमोल गोड हे कोतवाल म्हणून कार्यरत होते.
अमरावतीमधील वरुड तालुक्यातील पुसला गावात अमोल गोड हे कोतवाल म्हणून कार्यरत होते. त्यांचे लग्न थाटामाटात पार पडले. वधू आणि वर पक्षामध्ये आनंदाचे वातावरण होते. पण ज्या ठिकाणी सनईचे सूर वाजत होते, त्याच ठिकाणी नवरदेवाचा मृत्यू झाल्याने स्मशान शांतता पसरली. आयुष्याचा सर्वांत आनंदी दिवस असतानाच नवरी विधवा झाली. नवरदेवाचा हॉर्ट अटॅकने मृत्यू झाला अन् कुटुंबावर शोककळा पसरली.

