17.2 C
Latur
Sunday, January 11, 2026
Homeमहाराष्ट्र‘लाडकी’च्या हप्त्याबाबत काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

‘लाडकी’च्या हप्त्याबाबत काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई : प्रतिनिधी
लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम महिलांना देण्यात यावी, अशी मागणीच काँग्रेसने या पत्रातून केली आहे.

महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा हप्ता नेहमीच वादाच्या भोव-यात राहिला आहे. लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता असा एकत्रितपणे ३ हजार रुपयांचा हप्ता १४ किंवा १५ जानेवारी रोजी जमा होण्याची शक्यता होती. परंतु, हे दोन्ही महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याआधीच याबाबत आक्षेप घेणारे पत्र काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहे. ज्यानंतर निवडणूक आयोगाने सुद्धा काँग्रेसच्या या पत्राची गांभीर्याने दखल घेतली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी येत्या गुरुवारी म्हणजे १५ जानेवारीला मतदान होणार आहे, त्यामुळे निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना हप्ता देण्यात यावा, अशा आशयाचे पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला लिहिले आहे. पण काँग्रेसच्या या पत्रावर भाजपने संताप व्यक्त केला आहे.

लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम महिलांना देण्यात यावी, अशी मागणीच काँग्रेसने या पत्रातून केली आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबरच्या अखेरीस महिलांच्या खात्यात जमा केला आहे. त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ असे दोन महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा करण्याचा सरकारचा घाट आहे. ही बाब १ कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे.

एक प्रकारची लाचारी आहे. यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत आहे. त्यामुळे या योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतर द्यावे, असे निर्देश आयोगाने शासनास द्यावे, अशी विनंती असल्याचे पत्र काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिले आहे.
काँग्रेसने दिलेल्या या पत्राची आता राज्य निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. काँग्रेसच्या तक्रारीवर विचार करू, असे उत्तर आयोगाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या हप्त्याला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पण काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रामुळे भाजपने संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरला आहे. तो वरचेवर उफाळून येतो. आमच्या माता- भगिनींच्या चेह-यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, त्यावेळी ही योजना बंद करा म्हणून काँग्रेस समर्थक कार्यकर्त्याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती, असे मत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR