18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरलातुरात मुख्याध्यापक संघाचे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन

लातुरात मुख्याध्यापक संघाचे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन

लातूर : प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणेच्या राज्य कार्यकारणी बैठक रविवारी (दि. २०) येथील परिमल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडली. यावेळी चर्चा होऊन २०२४-२५ चे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन लातूर येथे २८ व २९ डिसेंबर रोजी घेण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.
यावेळी संयुक्त मंडळाचे अध्यक्ष के. एस. ढोमसे, संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, राज्य सचिव अशोक मोरे, राज्य उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव बी. जी. चोले, मार्गदर्शक वसंतराव पाटील, मारुती खेडेकर, एम. डी. देशमुख, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय शिरपूरकर, सचिव जे. एम. पैठणे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सतीश जगताप, पश्­िचम महाराष्ट्राचे एस. बी. देशमुख, खंडेराव जगदाळे, मनोहर पवार, डी. पी. कदम, मार्गदर्शक एच. एस. साखरे, जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, बी. एन. जाधव, नामदेव सोनवणे, बी. एम. भांगे, प्राचार्य बाबूराव जाधव, सी. के. साळुंखे, प्राचार्य श्रीनिवास जाधव, के. डी. महाजन, दिलीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चर्चा होऊन मुख्याध्यापक संघाचे २०२४-२५ चे ६१ वे राज्यस्तरीय अधिवेशन लातूर येथे २८ व २९ डिसेंबर रोजी घेण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी यांनी अधिवेशन घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले व अधिवेशन लातूरला शोभेसे असे होईल, याची खात्री व्यक्त केली. राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. एस. ढोमसे यांनी शाळा व मुख्याध्यापकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी विविध विषयांचे ठराव पारित करण्यात आले.
 राज्य अधिवेशनाचा ध्वज राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. एस. ढोमसे यांनी लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला व शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे लातूरला यजमानपद दिल्याबद्दल राज्य कार्यकारिणीचे आभार मानून, हे अधिवेशन हे ‘लातूर पॅटर्न’ला शोभेसे तसेच सर्वांना सोबत घेऊन एक आगळे वेगळे करण्याबाबत प्रकाश देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी राज्यातून आलेले मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी व मुख्याध्यापक  उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR