21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरलातूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष मिठाराम राठोड यांचे निधन

लातूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष मिठाराम राठोड यांचे निधन

रेणापूर : प्रतिनिधी
कॉग्रेसचे नेते लातुर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मागासवर्गीय सेवा संघ संस्थेचे अध्यक्ष मिठाराम राठोड यांचे हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवार दि. १७ मार्च रोजी पहाटे निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. सामाजिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात मिठाराम राठोड यांचे मोलाचे योगदान आहे. ग्राम पंचायत सदस्यापासून ते लातुर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद त्यांनी भुषविले. लातुर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तांडा सुधार योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. तसेच मागासवर्गीय सेवा संघ रुपचंदनगर येथील संस्थेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेच्या अंतर्गत चालणा-या युनिटमार्फत खेड्यापाड्यातील वाडी तांडे, वस्तीवरील मुला-मुलीना शैक्षणिक प्रवाहात आणुन विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना सामाजिक, धार्मिक क्षेत्राची आवड असल्याने दरवर्षी नवरात्र महोत्सव व दत्त जयंतीनिमित्त विविध समाजप्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करुन समाज प्रबोधन करण्याची परंपरा सुरु केली होत. रविवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सांयकाळी ५ वाजता आश्रम शाळेच्या प्रागणांत करण्यात आला.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, जावई, सुना, नांतु, असा मोठा परिवार आहे. ते माजी सभापती तथा प्राचार्य प्रदीप राठोड यांचे वडील होत. त्याच्या अंत्यसंस्काराला आश्रम शाळा संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळा संघटनेचे अध्यक्षासह, माजी आमदार त्र्यंबक भिसे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे उपाध्यक्ष तथा कॉग्रेसचे तालुध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव यांच्यासह सामाजिक, राजकीय, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR