लातूर : प्रतिनिधी
लातूर व नांदेड जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, ढगफुटी व पुरपस्थितीमुळे शेतक-यांसह नागरिकांचे खुप मोठे नूकसान झाले आहे. या नूकसानीचे तत्काळ पंचानामे करुन तातडीने मदत देण्यात यावी, या मागणीचे निवेदन लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
उदगीर येथील विश्वशांती बुद्ध विहार लोकार्पण व महिला मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दि. ४ सप्टेंबर रोजी उदगीरला आले होते. त्याप्रसंगी खासदार डॉ. काळगे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन दिले. लातूर व नांदेड जिल्ह्यात शेतीचे, पशुधनाचे व जमीनीचे प्रचंड नूकसान झाले आहे. काही ठिकाणी पुरामुळे शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. लातूर व नांदेड जिल्ह्यातील शेतक-यांना तातडीची मदत द्यावी, पिकविमा लागु करुन सर्व शेतक-यांचे पीक कर्ज माफ करावे, नव्यापे पीक कर्ज वाटप करावे, सरसकट पंचनामे करुन सानुग्रह अनुदान द्यावे, असेही खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी निवेदनात नमुद केले आहे.