23.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeलातूरलातूर बाजारपेठेत भाजीपाल्याची ८६४ टनांची आवक

लातूर बाजारपेठेत भाजीपाल्याची ८६४ टनांची आवक

लातूर : प्रतिनिधी

येथील महात्मा फुले मार्केट यार्डात आज पुन्हा भाजीपाल्याची आवक कमालीची घटली. आजच्या सौघ्यासाठी अवघ्या ८६४ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. त्यामुळे भाजी मंडईतील भाजीपाल्याची आवक कमी होत चाल्याने स्थानिक नागरीकांची गरज भागविणेही मुश्कील झाले. लातूर मंडईत लातूर जिल्हयासह शेजारी जिल्हयातून तसेच आदी भागांतून भाजीपाल्याची आवक होते. गेल्या काही दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पाउसामुळे भाजीपाल्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात येणारा भाजीपाल्यांची आवक कमी प्रमाणात होत असल्याचे व्यापारी वर्गानी सागीतले आहे.

या आवकरळी पावसाच्या नुकसानीमुळे लातूर बाजार समीतीमध्ये होणारी पालेभाज्यांची आवक सरासरीने तूलनेत घसरत चालली आहे. त्यामुळे घाउक बाजारात सध्या भाज्यांच्या दरामध्ये दुप्पट तिप्पट वाढ करून किरकोळ विक्रीते आपला खिसा भरत असल्याचे दिसून येत आहेत. मात्र गेल्या काही दिवसापासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत निगालेल्या पालेभाज्यांच्या दरात खरेदी केलेली भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पट तिप्पट दरात विक्री होत आहे. शहरातील महात्मा फुले मार्केट यार्डात भाज्यांची आवक कमी झाली असली तरी किरकोळ विक्रीते दरात वाढ करुन भाजीपाला विकत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट आता कामडले आहे.

लातूर जिल्हयासह विविध भागातील शेतक-यांनी यंदा मोठया प्रमाणात पालेभाज्यांची लागवड केली हाती. काही दिवस भाजीपाल्याचे उत्पादनही मोठया प्रमाणात झाल्याने विविध कृषी उत्पन्न बाजारपेठेत शेतक-याना चागला दरही मिळाला होता. भाजारपेठेत येणा-या भाजीच्या आवाकीमुळे भाज्यांचे दर कडाडल्याचे पाहायला मिळले हाते. परिणामी, मागील महिन्यात पडलेल्या आवकाळी पाउसामुळे सर्व भाजीपाल्याचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने सध्या लातूर बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. अजून काही दिवस अशी परीस्थिती राहील असेही व्यापा-यानी एकमतशी बालताना सागीतले आहे.

किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या दरात दुप्पट तिप्पट वाढ करुन विक्री करण्यात येत आहे. यात काकडी ५० ते ६० रुपये किलो, गवारी ७० ते ८० रुपये किलो, भेंडी ६० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो, पत्तागोभी ४० ते ५० रुपये किलो, मिरची ८० ते ९० रुपये किलो, शेपु ३० ते ३५ रुपये पेंडी, वागें ५० ते ६० रुपये किलो, शेवगा ९० ते १०० रुपये किलो, मेथी २० ते ३० रुपये पेंडी, कडिपत्ता २० रुपये किलो, दोडका ५० ते ६० रुपये किलो, शिमला मिरची ६० ते ७० रुपये किलो, लिंबू ९० रुपये किलो, अदरक १७० ते २०० रुपये किलो, कोथीबिर ३० ते ४० रुपये किलो, टोमॅटो ४० ते ५० रुपये किलो, गाजर ५० रुपये किलो, फुलगोभी ५० रुपये किलो, बटाटा ५० ते ६० रुपये किलो, कांदा पाथ ३० रुपये पेंडी, काळे वागें ६० ते ७० रुपये किलो, वरणा ७० रुपये किलो, गावरान वागें ४० ते ५० रुपये प्रतिकिलो प्रमाणे किरकोळ बाजारात विक्री केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR