28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरलातूर,नांदेड व पुणे येथून चोरी केलेल्या १० दुचाकींसह एका आरोपीस अटक

लातूर,नांदेड व पुणे येथून चोरी केलेल्या १० दुचाकींसह एका आरोपीस अटक

लातूर : प्रतिनिधी
लातूर,नांदेड व पुणे येथून चोरी केलेल्या १० मोटारसायकलीसह एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.   या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक  गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषत: मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते.
त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, दिनांक २५ नोव्हंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील एक गुन्हेगार त्याने चोरलेली मोटरसायकल विकण्यासाठी भामरी चौक परिसरात फिरत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक तात्काळ भामरी चौक परिसरात पोचून रोडवर मोटार सायकलसह थांबलेल्या इसमाला विश्वासात घेऊन  विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव लखन वाघंबर छपरावळे, वय २४ वर्ष, राहणार हिप्पळगाव, तालुका शिरूर अनंतपाळ, जिल्हा लातूर  असे असल्याचे सांगितले.
तसेच त्यांच्या ताब्यात असलेल्या वाहना संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटरसायकल दोन वर्षांपूर्वी लातूर शहरातील ठिकाणावरून चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे आणखीन तपास केला असता त्याने लातूर सहीत नांदेड व पुणे जिल्ह्यातूनही मोटरसायकली चोरी करून एमआयडीसी परिसरात लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यावरून नमूद आरोपीकडून त्याने लातूर नांदेड व  पुणे जिल्ह्यातून चोरी केलेल्या एकूण १० मोटरसायकली ज्याची किंमत ३ लाख ५० हजार रुपये असा असून सदरचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस ठाणे शिवाजीनगर लातूर येथील १ गुन्हा, नांदेड जिल्ह्यातील २ मोटरसायकल चोरीचे गुन्हे, तसेच पुणे जिल्ह्यातील ४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे असे एकूण ७ मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. नमूद आरोपीला पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे पुढील कार्यवाहीस्तव ताब्यात देण्यात आले असून संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, विनोद चलवाड, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, संतोष खांडेकर, राजेश कंचे, चालक पोलीस अमलदार  प्रदीप चोपणे, चंद्रकांत केंद्रे, यांनी पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR