मुंबई : प्रतिनिधी
गणपती बाप्पाचा गणेशोत्सव यंदा जोरदार साजरा होत आहे. आता विसर्जनाची घटिका समीप येऊन ठेपली आहे. उद्या भाविक आपल्या लाडक्या गणरायाला अनंत चतुदर्शीला भावपूर्ण निरोप देतील.
आता विसर्जनाची लगबग सुरू झाली आहे. लागबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनाची तयारी सुरू केली आहे. यामुळे चरण स्पर्शची रांग सकाळी ६ वाजता बंद करण्यात आली असून मुखदर्शनाची रांगही आज रात्री १२ वाजता बंद करण्यात येणार आहे. उद्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सध्या सुरू आहे. आज रोजच्या तुलनेत लालबाग परिसरात भाविकांची गर्दी कमी प्रमाणात पाहायला मिळत आहे.
लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे धाकटे सुपूत्र अनंत अंबानी यांची लालबागचा राजा गणेश उत्सव मंडळाच्या मानद सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनंत अंबानी यांची लालाबागच्या राजावर मोठी श्रद्धा आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनंत अंबानी यांच्या नियुक्तीला मंजुरी मिळाली. अंबानी कुटुंबाचा धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.