नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आर्थिकदृष्ट्या यंदाचे बजेट फार महत्त्वाचे ठरले. तुम्हाला माहिती आहे का, महिलांच्या लिपस्टिक आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचाही अन्योन्यसंबंध आहे. महिलांच्या लिपस्टिक खरेदीच्या पद्धतींवर निर्देशांक तयार केला जातो. हा निर्देशांक अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवतो.
तसे लिपस्टिक फार स्वस्त असतात. लिपस्टिकच्या एका टयूबची किंमत २५० ते १००० रुपयांपर्यंत असते. मात्र एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे आकलन लिपस्टिक सारख्या सौंदर्य उत्पादनांच्या माध्यमातून देखील केले जाते. जगात अनेक ठिकाणी महिलांच्या लिपस्टिक खरेदीच्या पद्धतींवर निर्देशांक तयार केला जातो. हा निर्देशांक अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवतो.
इतिहासात असे दाखवण्यात आले आहे की, आर्थिक संकट समोर उभे राहते तेव्हा महिला महागड्या ब्यूटी प्रॉडक्टवर कमी खर्च करतात. जेव्हा लिपस्टिकची विक्री वाढते आणि लक्झरी सौंदर्य वस्तूंची विक्री कमी होते. अशा परिस्थितीत हे देशासमोरील आर्थिक संकटाचे लक्षण मानले जाते.
लिपस्टिकच्या विक्रीचे परिमाण समजून घेण्यासाठी कॉस्मेटिक कंपनी ओरियल, स्टी लॉउडर, शुगर, मॅमार्थ आणि अल्ट्रा ब्युटी यांच्याकडे पाहू शकता. गेल्या काही वर्षांमध्ये या कंपन्यांनी मोठी कमाई केली आहे. जीडीपी, नोक-यांसारख्या पारंपारिक आकडेवारीकडे अर्थतज्ज्ञ कमी लक्ष देत आहेत. ते आता अद्वितीय आर्थिक निर्देशकांवर लक्ष केंद्रित करत आहेत. तात्पर्य, जेव्हा लिपस्टिकची विक्री वाढते आणि इतर महागड्या वस्तूंची विक्री घटते. अशात हा आर्थिक संकटाचा संकेत असू शकतो.