20.2 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeलातूरलोकशाहीच्या मतोत्सवात पोलिसांची मोठे योगदान  

लोकशाहीच्या मतोत्सवात पोलिसांची मोठे योगदान  

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मतदान करण्यासाठी येत असलेले वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना मदत करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी कर्तव्यावरील पोलिसांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मतदान बुथवरील पोलीस अधिकारी अमलदारांनी दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना मदत केली. लोकशाहीच्या मतोत्सवात पोलिसांचे मोठे योगदान ठरले.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्विभुमीवर पोलिसांनी दक्षता घेतली होती. त्या अनुषंगाने विविध उपाययोजनाही करण्यात आलेल्या होत्या. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, गुन्हेगारांवर दबाव राहाव म्हणून पोलिस दलातर्फे शहरात व लातूर जिल् तील २३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये पथसंचलन करण्यात आले होते. निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी लातूर पोलीस प्रशासन सज्ज झाले होते. त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
 स्वत: पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, परीविक्षाधीन पोलिस अधीक्षक सागर खर्डे, पोलीस उपाधीक्षक लातूर शहर रणजित सावंत यांनी शहरातील मुख्य रस्त्यांवरुन मोठ्या फौजफाट्यासह रुट मार्च काढला होता.  प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पोलिसांनी जिल्ह्यातील २ हजार १४३ मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त होता. या सर्वच मतदान केंद्रावर पोलिसबांधवांनी ज्येष्ठÑ, वयोवृद्ध मतदार तसेच दिव्यंग मतदारांना मतदान केंद्रापर्यत पोचण्यासाठी सहकार्य केले. मतदारांच्या हाताला धरुन त्यांना पोलिसबांधवांनी आधार दिला. पोलिसबांधवांचे हे सहकार्य मतदारांसाठी खुप महत्वाचे ठरले. पोलिसबांधवांच्या या मदतीमुळे पोलिस आणि नागरिकांमधील अंतर खुप कमी झाले. ज्येष्ठांना मिळालेला पोलिस बांधवांचा आधार लक्षवेधी ठरला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR