पुणे : प्रतिनिधी
लहान असताना वडिलांनी मला रोज एक चित्र काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र तेव्हा मी त्यांचे ऐकले नाही. जर मी त्यांचं ऐकलं असतं तर आज या ठिकाणी माझं देखील व्यंगचित्र दिसलं असतं, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे व्यंग चित्रपदर्शन भरविण्यात आले असून या प्रदर्शनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी हजेरी लावली. या प्रदर्शनातील व्यंगचित्रांचे अमित ठाकरे यांनी कौतुक केले.
पुढे ते म्हणाले, मला आज एवढं वाईट वाटतंय जो माझ्या वडिलांनी मला सल्ला दिला तो मी ऐकला असता तर माझं एक व्यंगचित्र इथं लागलं असतं. जो मी ऐकला नाही. ही कला तुम्हाला कोणी शिकवून चालत नाही. ती खरंतर तुमच्या आत असावी लागते, असे देखील यावेळी बोलताना ते म्हणाले. माझे अनेक मित्र चित्रकला शिकले आहेत.
एक तास व्यंगचित्राला देत जा
ही कला तुमच्या आत आहे. मुलांनो ही तुमच्यातली कला आहे, ती घालवू नका, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच जो वडिलांनी मला सल्ला दिला तोच मी तुम्हाला देईन, असे देखील त्यांनी नमूद केले. कामात कितीही व्यस्त झालात तरी आयुष्यात रोज एक तास व्यंगचित्राला देत जा असे त्यांनी यावेळी सांगितले.