जळकोट : प्रतिनिधी
जळकळोट तालुक्यातील वांजरवाडा येथील शेतकरी रामदास प्रभाकर जानापुरे (वय ५०) या शेतक-यााने कर्जबाजारीपणास व नापीकीस कंठाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि १२ एप्रिल रोजी उघडकीस आली .
वांजरवाडा येथील रामदास प्रभाकर जानापूरे यांनी एका बॅकेकडून कर्ज घेतले होते परंतु यावर्षी वांजरवाडा परिसरात दुष्काळ आहे , पाऊस नसल्यामुळे शेतीमध्ये काहीच पिकले नाही , यामुळे यावर्षी म्हणावे तेवढे उत्पन्न झाले नाही यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे व कुटुंब कसे चालवावे , असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यांनी दि १२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास मंगरूळ शिवारातील हशम महबूब पटेल यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. जळकोट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार मिटकरी हे करीत आहेत.