32.5 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रवाघ्या कुत्र्यासंदर्भात ऐतिहासिक संदर्भ नाही

वाघ्या कुत्र्यासंदर्भात ऐतिहासिक संदर्भ नाही

दंतकथेतून स्मारक बांधण्यात आले संभाजीराजेंनी मांडली भूमिका

मुंबई : रायगड किल्ल्यावर असलेल्या वाघ्या कुत्र्यासंदर्भात कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. १९३६ साली वाघ्या कुत्र्याचे स्मारक का बांधले गेले? यावरून अनेक वाद-विवाद आहेत. पण, वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याचा विषय मी घेतला आहे, अशी माहिती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. पुरातत्त्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतल्यावर संभाजीराजे छत्रपती हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, पुरातत्त्व खात्याने माहितीच्या अधिकारात सांगितले की, ‘वाघ्या कुत्र्याची संरक्षित स्मारकात नोंद नाही. वाघ्या कुत्र्याचे स्मारक १९३६ साली पूर्ण झाले. २०३६ पर्यंत हे कुत्र्याचे स्मारक काढले नाही, तर त्याची संरक्षित स्मारकात नोंद केली जाईल.’ त्यामुळे वाघ्या कुत्रा हटवण्याचा विषय मी घेतला आहे. अनेक शिवभक्तांनी सुद्धा हा विषय घेतला होता. पण, दुर्दैवाने त्यांना न्याय मिळाला नाही.

वाघ्या कुत्र्यासंदर्भात कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही. शिवाजी महाराज यांना अग्नी दिल्यावर वाघ्या कुत्र्याने त्यात उडी मारली, असे बोलले जाते. १९३६ मध्ये वाघ्या कुत्र्याचे स्मारक का बांधले गेले? यावरून अनेक वादविवाद आहेत. महाराष्ट्रातील एकाही इतिहासकाराने वाघ्या कुत्र्यासंदर्भात पुरावे दिले नाहीत. शिवाजी महाराज यांच्यावेळी कुत्रे होते का? हा प्रश्न निर्माण होतो. कुत्रे होते का? हे मी नाकारू शकत नाही. ते असू शकतात, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

‘राजसंन्यास’ नाटकातून दंतकथा निर्माण झाली आहे. ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली. त्याच दंतकथेतून वाघ्या कुत्रा प्रकट झाला आणि स्मारक बांधण्यात आले. सगळे इतिहासकार, मला आणि विरोध करणा-यांना सरकारने बोलवावे आणि चर्चा करावी. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाची उंची शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा जास्त आहे. हे कुणाला आवडेल का? असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR