लातूर : प्रतिनिधी
शिरुर अनंतपाळ तालुक्यातील हालकी जवळील शेंद शिवारातील मांजरा नदी पात्रातील वाळूची अवैधरित्या उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच उपविभाग चाकुरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक बी .चंद्रकांत रेड्डी यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय कार्यालयातील पोलीस अधिकारी अमलदार, पोलीस स्टेशन चाकूर व शिरुर अनंतपाळ येथील अधिकारी अमलदारांची पथके तयार करून नमुद ठिकाणी दि. १७ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हालकी जवळील शेंद शिवारातील मांजरा नदी परिसरात छापा टाकला.
याठिकाणी बाळू बोडके रा. शेंद ता. निलंगा, आदित्य बालाजी पाटील, इरफान पठाण रा. निलंगा, ईश्वर पाटील रा. निलंगा, अर्जुन काशीनाथ डेचे रा. औराद शहाजनी ता. निलंगा, पोकलेन चालक, पोकलेन मालक व इतर ६ ते ७ व्यक्तींनी संगणमत करून मांजरा नदी पात्रातील वाळू गौण खणिज लोखंडी बोटी व सक्शन पंपाच्या साह्याने बेकायदेशीर शासकीय विनापास परवाना शासनाचे महसूल बुडविण्याच्या उद्देशाने व पर्यावरणाचा रास होईल याची माहिती असताना देखील वाळूचा चोरटा उपसा करून अवैधरित्या चोरटी विक्री करण्यासाठी शेंद ता. निलंगा शिवारात मोकळ्या जागेमध्ये अंदाजे २० ब्रास वाळू व सदर वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेली १ लाखंडी बोट, सक्शन पंपासह १ पोकलेन मशीन, १ हायवा टिप्पर असा ६० लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अन्सापूरे पोस्टे शिरुर अनंतपाळ हे करीत आहेत. सदरची कारवाई वरीष्ठांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोलीस उपनिरीक्षक अच्युत सुर्यवंशी, पोलीस अमलदार शिराज शेख, दिपक सोनकांबळे, सुर्यकांत कोळेकर, लक्ष्मण आरदवाड, रायभोळे, रितेश आंदुरकर, सगर, महादेव फुले. महिला पोलीस अमलदार पुनम शेटे यांनी केली आहे.